बोळे विकासोच्या अध्यक्षपदी प्रदीप गिरासे तर उपाध्यक्षपदी गुलाब गिरासे बिनविरोध

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील बोळे येथे निवडणुकीमुळे एकाच गावात २ गट तयार होणे. त्याच्याने वाद निर्माण होणे यातुन गावाची शांतता भंग होते. त्यामुळे बोळे येथील ग्रामस्थांनी एकमत करत आ.चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध करण्यात आली. त्यानंतर गेल्या २ दिवसांपुर्वीच बोळे विकासोची चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड देखील बिनविरोध करून इतर गावांना गावातील एकोप्याचा संदेश दिला.

या निवडीबद्दल चेअरमन प्रदीप आबा गिरासे, व्हा.चेअरमन गुलाब रामसिंग गिरासे व सर्व संचालक मंडळाचे आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.अमोल पाटील यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

Protected Content