पारोळा येथे आझाद चौकातील मुतारी देत आहे अपघातास निमंत्रण

WhatsApp Image 2020 01 13 at 12.16.39 PM

पारोळा, प्रतिनिधी | शहरातील आझाद चौकामध्ये जवळपास वीस ते पंचवीस वर्ष जुनी मुतारी असून ती आता पडण्याच्या स्थितीत आली असून येथे कोणतीही दुर्घटना घडू शकते. अशी कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी हि मुतारी नगरपालिका प्रशासनने जमीनदोस्त करून तेथे नवीन बांधकाम करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

आझाद चौकातील मुतारीचा वापर करण्यासाठी जवळपास एक ते दीड किलोमीटरवरून नागरिक येत असतात. एवढ्या मोठ्या परिसरामध्ये दुसरी एकही मुतारी नसल्यामुळे या परिसरातील नागरिक येथे येत असतात. मडक्या मारुती चौक, मोठा महादेव चौक, शिवाजी विभाग, शेवडी गल्ली, दिल्ली दरवाजा, बडा मोहल्ला, हत्ती गल्ली, तेली भवन, लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय परिसरातील लोक या ठिकाणी रात्री-बेरात्री मुतारीसाठी येत असतात. या मुतारीची भिंत खालून पूर्णपणे पोखरली गेली असून मुतारी शेवटची घटका मोजत असताना मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी ही मुतारी त्वरित नगरपालिका प्रशासनाने जमीनदोस्त करून नवीन बांधकाम करण्यात यावे. तसे न झाल्यास सर्व परिसरातील नागरिक नगरपालिकेवर मोर्चा काढतील असे आझाद चौकातील ज्येष्ठ, तरुण नागरिकांकडून बोलले जात आहे. मुतारीच्या आजुबाजूला सुट्टीच्या दिवशी लहान मुलं बॅट बॉल व व इतर खेळ खेळत असतात व मुतारीच्या बाजूने झपाट भवानी चौकाकडे येणार्‍या जाणार्‍यांचे मोठी वर्दळ असते. त्या मुतारीच्या मोठा अपघात झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असे नागरिकांकडून बोलले जात आहे.

Protected Content