खळबळजनक : जळगावात आढळले मृत अर्भक

Crime news1

जळगाव प्रतिनिधी । शहारातील नवीन बी.जे. मार्केट परीसरातील कचराकुंडीत नवजात बालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. जिल्हा पेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, नवीन बी.जे. मार्केट परीसरात असलेल्या कचरा कुंडी जवळ काही कचरा वेचणाऱ्या मुलांची वर्दळ असते. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास कचरा वेचणाऱ्या मुलांना एका कापडात गुंडाळलेले स्त्री जातीने नवजात अर्भक मिळून आले. त्यावेळी साक्षी ऑटो गॅरेजजवळ पेपर वाचत असलेले गॅरेज मालक शेख रियान शेख मुनाफ आणि स्वच्छता कर्मचारी रवि हंसराज यांनी गर्दी का जमली आहे. हे पाहण्यासाठी गेले तर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोउनि एम.ए.वाघमारे, एनपीसी निलेश पाटील, रामेश्वर ताठे यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, पोलीसांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात या अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला.

अर्भकांना फेकून देणाऱ्या मातेवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान नवजात अर्भक हे स्त्रि जातीचे असून बालकाला मरून टाकण्यात आला असावा असा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

Protected Content