के.सी.ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वर आले जुळुनी’

mj college jalgaon

जळगाव, प्रतिनिधी | के.सी.ई. सोसायटी संचलित मू. जे स्वायत्त महाविद्यालय यांच्या ( स्कूल ऑफ व्हीजुअल आर्टस) कान्ह ललित कला केंद्र, व स्वरदा संगीत विभागातर्फे के.सी.ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वर आले जुळुनी’ या संगीतमय मैफिलीचे आयोजन गुरुवार २३ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.

‘स्वर आले जुळुनी’ या संगीतमय मैफिली ही महाविद्यालयातील जुना कॉन्फरन्स हॉल येथे गुरुवार २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या संगीत मैफिलीला दीपेश पटेल, बडोदा- (बासरी), कौशल कुमार, मुंबई- (सारंगी), नारायण प्रधान( ऑटोपॅड), करण भंडारी, अहमदाबाद( बासरी), पलाश जयस्वाल-मुंबई (सिंथेसायझर) व स्वानंद देशमुख- जळगाव ( पखवाज) यांची साथसंगत लाभणार आहे. तर गायक म्हणून जळगावच्या प्रिया सायखेडे व ग्वाल्हेरचे यश देवले असतील. जळगाव शहरात संगीतप्रेमींची संख्या लक्षात घेता, संगीत व त्याच्याशी निगडीत विविध वाद्यातून जेंव्हा लयबद्धरित्या जो सूर निर्माण केला जातो, तो मनाला अगदी सुखावून टाकतो. संगीतप्रेमींना या संगीत मैफिलीचा व सात सुरांच्या एकत्रित मिलापाची मेजवानी मिळाली पाहिजे, हा यामागचा हेतू आहे. संगीतातील सात सूर हे जीवनाच्या सुख-दुखात मानसिक आधार देणारे औषध आहे असे म्हणतात. यासाठी प्रत्येक नागरिकाने याचा लाभ निश्चित घेतलाच पाहिजे. या कार्यक्रमाचे निवेदन ईशा वडोदकर करणार आहेत. या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन कान्ह ललित केंद्र व स्वरदा संगीत विभागातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content