पती-पत्नी कोरोना पॉझिटीव्ह ! : लॉकडाऊनचे कठोर पालन आवश्यक

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत या विषाणूने ग्रासलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या पतीलाही याने बाधीत केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करायचा असेल तर लॉकडाऊनचे कठोर पालन करण्याची गरज देखील यातून अधोरेखीत झाली आहे.

कालच कोरोनाची संशयित रूग्ण असणारी महिला शासकीय जिल्हा रूग्णालयात मृत पावली होती. या महिलेच्या स्वॅब चाचणीचा रिपोर्ट आज रात्री आला. यात ती महिला पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. यासोबत तिच्या पतीचे काल घेतलेले सँपल देखील पॉझिटीव्ह आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग प्रचंड झपाट्याने होत असल्याचे आधीच स्पष्ट झाले असून याचे उदाहरण आता जळगाव जिल्ह्यात दिसून आल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधीत मृत महिला ही अमळनेर येथील साळी वाड्यातील रहिवासी आहे. तर तिच्या पतीचे शहरात किराणा दुकान आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : जळगावात आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह

जळगाव जिल्ह्यास ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले असून काल अर्थात २० एप्रिल पासून काही प्रमाणात लॉकडाऊन हे शिथील करण्यात आले आहे. यात शेतीकामांसह अत्यावश्यक सेवांना शिथीलता देण्यात आलेली आहे. मात्र यामुळे सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात जर कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करायचा असेल तर लॉकडाऊनचे कठोर पालन करण्याची आवश्यकता असल्याची बाब आता उघड झालेली आहे. नागरिकांनी याचे पालन केले तरच आपण कोरोनाचा यशस्वी मुकाबला करू शकतो. अन्यथा जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढण्याची भिती आहे.

हे देखील वाचा – घाबरू नका…पण जागरूक रहा- जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

दरम्यान, आजच्या दोन रूग्णांसह आता जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या पाचवर पोहचली आहे. यात मेहरूणमधील रूग्ण बरा होऊन घरी पोहचला आहे. तर सालार नगरातील एक रूग्ण आधीच मरण पावला आहे. मुंगसे (ता. अमळनेर) येथील महिलेवर उपचार सुरू आहेत. तर आता पती-पत्नीला कोरोनाने ग्रासले असून यात पत्नीला प्राण गमवावे लागले असून पतीवर उपचार सुरू आहेत. अर्थात, जळगावात कोरोनाचा एक रूग्ण बरा झाला असून दोघांवर उपचार सुरू असून दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content