पालघरच्या हत्याकांडाचा सदगुरू भास्करगिरी गुरू किसनगिरीबाबा यांनी केला निषेध

नगर प्रतिनिधी । पालघर जिल्ह्यात दोन महंतांसह तिघांना अतिशय अमानुषपणे मारहाण करून त्यांची हत्या करण्याच्या प्रकरणाचा सदगुरू भास्करगिरी गुरू किसनगुरूबाबा यांनी तीव्र निषेध केला असून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, पालघर येथील सामूहिक हत्याकांडामुळे समाजमन सुन्न झाले आहे. याचा धार्मिक क्षेत्रातूनही अतिशय तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने श्री क्षेत्र देवगड (ता. नेवासे जिल्हा अहमदनगर) येथील श्री दत्त मंदिर संस्थानाचे सदगुरू भास्करगिरी गुरू किसनगिरीबाबा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, पंचदशनाम आखाड्याचे श्री कल्पवृक्ष गिरी, संत सुशील गिरी व वाहनचालक निलेश तेलगडे यांची पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाजवळ झालेली क्रूर हत्या ही अतिशय निषेधार्ह अशी आहे. पोलिसांच्या उपस्थितीत घडलेल्या या क्रूर घटनेचा श्री क्षेत्र देवगड भक्त परिवार व श्री दत्त मंदिर संस्थान तीव्र निषेध करत आहे. संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने एकटा-दुकटा देखील बाहेर पडू शकत नसतांना एका ठिकाणी जमाव जमून ज्या पध्दतीने भयंकर हत्याकांड घडवून आणतो ते खूप संशयास्पद वाटत आहे. पोलिसांसमोर घडलेली ही घटना पुरोगामी म्हणविल्या जाणार्‍या महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक अशीच आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, संबंधीत साधूंचे वय लक्षात घेता, एखाद्या साध्या बहाण्याने त्यांची अतिशय नियोजनपूर्व हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. इतकी भयंकर घटना घडूनही कथित मानवतावादी कार्यकर्ते व मीडियानेही याची विलंबाने दखल घेतल्याची बाब खेदजनक आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष देऊन संबंधीत पोलीस कर्मचार्‍यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. तर यातील दोषींना कठोरातला कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी सदगुरू भास्करगिरी गुरू किसनगिरीबाबा यांनी या पत्रात केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content