समाजवादी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष रागिब अहमद यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

congresss

जळगाव (प्रतिनिधी)। समाजवादीचे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रागिब अहमद यांच्यासह माजी कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसचे महानगरप्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या दिड महिनाभरापासून शहरातील विविध क्षेत्रातील, समाज घटकातील सूशिक्षीत वर्गाशी, चळवळीतील लोकांशी वैयक्तिक संपर्क, चर्चा सूरू आहे. त्यातून अनेक तरूण, सूशिक्षित चेहऱ्यांना शहर काँग्रेसने जबाबदारी दिली असल्याची माहिती रागीब अहमद यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच महाराष्ट्रात विद्यमान भाजपा सरकारचे अपयश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष अशोकराव चव्हाण हे जनतेसमोर प्रभावीपणे मांडताहेत असल्यामुळे आम्ही समाजवादी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडून कॉंग्रेस मध्ये प्रवेश करीत असल्याचे यावेळी रागीब अहमद यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा सचिव फरहान खान, माजी शहर सचिव तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अल्ताफ शेख, मूश्ताक शेख, सामाजिक कार्यकर्ते तबरेज शेख, अब्दुल कदीर, युनस शेख हे प्रवेश करीत आहोत असे सांगितले. यावेळी माजी जिल्हा सचिव फरहान खान, माजी शहर सचिव तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अल्ताफ शेख, मूश्ताक शेख, सामाजिक कार्यकर्ते तबरेज शेख, अब्दुल कदीर, युनस शेख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!