Breaking : जळगावात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण; पत्नीचा मृत्यू…पतीवर उपचार !

जळगाव- येथील कोविड रुग्णालयात काल घेण्यात आलेल्या कोरोणा संशयित रुग्णांपैकी दोन रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी दिली आहे. यातील महिला मृत झाली असून तिच्या पतीलाही कोरोनाने ग्रासले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या कोरोना बाधित रुग्णांपैकी एका ५२ वर्षीय महिलेचा कालच रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर दुसरा रुग्ण हा त्या महिलेचा पती असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आता अधिक जबाबदारीने लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करावे. व घरातच रहावे कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे. जिल्हावासियांनी स्वतः ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. गर्दी टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये. मीच माझा रक्षक ही भूमिका अंगी बाळगून घरातच रहावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रूग्ण आढळले नसतांना आज दोन पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने चांगल्या उपाययोजना केल्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढलेली नाही. यात मेहरूण येथील पॉझिटीव्ह रूग्णाची उपचारा नंतरची चाचणी निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांचा उत्साह दुणावला होता. तथापि, आता दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. संबंधीत मृत महिला ही अमळनेर येथील साळी वाड्यातील रहिवासी आहे. तर तिच्या पतीचे शहरात किराणा दुकान आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content