संयुक्त वन व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी अजय भालेराव

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वड्री येथील संयुक्त वन व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी सरपंच अजय भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान आज वनविभागातील वनरक्षक विक्रम पदमोर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. वड्री गावाचे माजी सरपंच ललीत चौधरी यांचा पाच वर्षाचा संयुक्त वन व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदाचे कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांच्या जागेवर वड्री ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अजय भालेराव यांची संयुक्त वन व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वनरक्षक विक्रम पदमोर, वनपाल रविकांत सोनवणे, वनपाल रवि तायडे, काँग्रेस आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष तथा संयुक्त वन व्यवस्थापक समितीचे सदस्य बशीर तडवी, अनिल पाटील, रवी खर्च, रोजगार सेवक फकीरा तडवी, अरमान तडवी यांनी वन समिती सदस्य अय्युब तडवी, यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय भालेराव यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी सर्व वनरक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!