आला १ टेराबाईट स्टोअरेजचा आयफोन !

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या शानदार इव्हेंटमध्ये अॅपल कंपनीने आपले नवीन प्रॉडक्ट लॉंच केले असून यात तब्बल एक टिबी (टेराबाईट) स्टोअरेज असणार्‍या आयफोन १३ प्रो या मॉडेलचाही समावेश आहे. जाणून घ्या याबाबतची इत्यंभूत माहिती.

साधारणपणे प्रत्येक सप्टेंबर महिन्यात आयफोनचे नवीन मॉडेल लॉंच होत असते. यासाठी ऍपल कंपनी एका अतिशय जबरदस्त कार्यक्रमाचे आयोजन करून यात आयफोनसह अन्य प्रॉडक्टची घोषणा करत असल्याची आता परंपरा बनली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे व्हर्च्युअल प्रकारात लॉंचींग करण्यात आले होते. यंदा याच प्रकारातील लॉंचीग कार्यक्रम काल रात्री पार पडला. याप अपेक्षेनुसार आयफोन, आयपॅॅड आदींसह अन्य प्रॉडक्टची घोषणा करण्यात आली. यात सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू हा अर्थातच आयफोन राहिला.

ऍपल कंपनीने आता आपल्या ग्राहकांसाठी आयफोन १३ हे मॉडेल लॉंच केले आहे. https://livetrends.news यात आयफोन १३, आयफोन १३ मिनी, आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. यातील पहिल्या दोन मॉडेल्सचे अधिकतम स्टोअरेज २५६ जीबी आहे. तर उर्वरित दोघांमध्ये तब्बल एक टिबी स्टोअरेजचा पर्याय उपलब्ध आहे. हे चारही मॉडेल्स डस्टप्रुफ आणि वॉटरप्रूफ असून ते रफ वापरासाठी सक्षम असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. हे सर्व मॉडेल्स पिंक, ब्ल्यू, मिडनाईट, स्टारलाईट आणि प्रॉडक्ट रेड या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे.

आयफोनच्या चारही मॉडेल्सची रॅम आणि कॅमेर्‍यांची क्षमता याबाबत कंपनीने माहिती जाहीर केलेली नाही. तथापि, आयफोनचे कॅमेरे हे अतिशय दर्जेदार असल्याचे आधीच सिध्द झाले असून या चारही मॉडेल्समध्ये ही परंपरा कायम राखण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यातील दोन्ही प्रिमीयम मॉडेल्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असून याच्या अंतर्गत टेलीफोटो लेन्स या अतिरिक्त कॅमेर्‍याचा समावेश करण्यात आलेला आहे. यात नाईट मोडसह अन्य फिचर्सचा समावेश असून यामुळे याच्या माध्यमातून अगदी दर्जेदार छायाचित्रे आणि व्हिडीओजचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात ए-१५ बायोनिक प्रोसेसर असून तो आधीच्या प्रोसेसरपेक्षा गतीमान आहे. तर या सर्व मॉडेल्समध्ये फाईव्ह-जी नेटवर्कचा सपोर्ट प्रदान करण्यात आलेला आहे. तर आधीच्या मॉडेल्सपेक्षा याची बॅटरी दीड तासाचे जास्त चालणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

आयफोनच्या या चारही मॉडेल्समध्ये अतिशय उत्तम दर्जाचा डिस्प्ले प्रदान केलेला आहे. यात कॅमेर्‍यासाठी असणारा नॉच https://livetrends.news हा आकाराने अजून कमी करण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर आयफोन १३ प्रो आणि प्रो मॅक्स या मॉडेल्समध्ये १२० हर्टझ रिस्पॉन्स असणारा डिस्प्ले असून यावर अगदी जीवंत वाटणार्‍या दृश्यानुभूतीचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आलेले आहे.

भारतातील मूल्य

आयफोनचे चारही मॉडेल्स हे जागतिक पातळीवर लॉंच करण्यात आले असून यात भारताचाही समावेश आहे. या चारही मॉडेल्सच्या भारतातील विविध व्हेरियंटसचे मूल्य खालीलप्रमाणे असणार आहे.

आयफोन १३ प्रो मॅक्स

१२८ जीबी स्टोअरेज : १,२९,९०० रूपये
२५६ जीबी स्टोअरेज : १,३९.९०० रूपये
५१२ जीबी स्टोअरेज : १,५९,९०० रूपये
१ टिबी स्टोअरेज : १,७९,९०० रूपये

आयफोन १३ प्रो

१२८ जीबी स्टोअरेज : १,१९,९०० रूपये
२५६ जीबी स्टोअरेज : १,२९,९०० रूपये
५१२ जीबी स्टोअरेज : १,४९,९०० रूपये
१ टिबी स्टोअरेज : १,६९,९०० रूपये

आयफोन १३

१२८ जीबी स्टोअरेज : ७९,९०० रूपये
२५६ जीबी स्टोअरेज : ८९,९०० रूपये
५१२ जीबी स्टोअरेज :१,०९,९०० रूपये

आयफोन १३ मिनी

१२८ जीबी स्टोअरेज : ६९,९०० रूपये
२५६ जीबी स्टोअरेज : ७९,९०० रूपये
५१२ जीबी स्टोअरेज : ९९,९०० रूपये

या सर्व मॉडेल्सची अगावू नोंदणी १७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २४ सप्टेंबर पासून हे मॉडेल्स प्रत्यक्षात ग्राहकांना मिळणार आहे.

Protected Content