रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी – पीसीआर टेस्ट होणार

नवी दिल्ली – रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आली असली, तरी संबंधितांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील, तर अश्या रुग्णांची आरटी-पीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. कोरोनाची सर्व लक्षणे (ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास) असलेल्यांची अँटीजन चाचणी निगेटीव्ह आलेली व्यक्ती आणि अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर २ ते ३ दिवसात पुन्हा लक्षणे आढळून येणारी व्यक्तीला चाचणी करणे बंधकारण राहील ,असे आयसीएमआर तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमधून स्पष्ट करण्यात आले आहे.  अँटीजन टेस्ट निगेटीव्ह येणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याची आरटी-पीसीआर करणे बंधनकारक आहे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने एकत्रितपणे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

अशा लक्षणे आढळणाऱ्या निगेटीव्ह केसेसमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून इतर व्यक्तींना त्याची लागण होऊ नये, याची खात्री करणे गरजेचे आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांना लवकरात लवकर आयसोलेट करणे शक्य होईल, असे पत्रातून नमुद करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जिल्हा पातळीवर एक देखरेख यंत्रणा उभारण्यास सांगितले असून राज्य पातळीवर समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. या टीमने जिल्हा आणि राज्य पातळीवर केल्या जाणाऱ्या आरटी-पीसीआर टेस्टची पाहाणी करावी,असे निर्देश दिले आहेत. देशातील मृतांचा आकडा ७५,०६२ वर पोहचला आहे. दरम्यान दिवसागणित नव्या रुग्णांची मोठी भर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी रुग्णांचे वेळीच निदान होणे अत्यंत आवश्यक आहे.

Protected Content