संसदेचे पावसाळी अधिवेश स्थगित; कोरोनामुळे निर्णय

नवी दिल्ली । कोरोनाच्या आपत्तीमुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्‍चीत काळासाठी स्थगित करण्यात आले असून संसदीय कामकाज मंत्री मुरलीधरन यांनी याबाबतची माहिती राज्यसभेत दिली.

संसदेचे पावसाळी अधिवेशन हे वेळेआधीच स्थगित होणार असल्याची माहिती आधीच समोर आली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून आज लोकसभा व राज्यसभेत शेवटच्या दिवसाचे कामकाज होणार असून यानंतर हे अधिवेशन अनिश्‍चीत काळासाठी तहकूब करण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली आहे.

गृह आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून याआधी राज्यसभेत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच आज संध्याकाळी सहा वाजता लोकसभेची कार्यवाही सुरू होईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी संध्याकाळी सभागृहात याची घोषणा केली. राज्यसभेला अधिक वेळ देण्यासाठी हे केले जात आहे, जेणेकरून लोकसभेमधून मंजूर झालेली बिलेही वरच्या सभागृहातून मंजूर होऊ शकतील.

कोरोना काळात सामाजिक अंतर राखण्यासाठी दोन्ही सभागृहात दोन्ही सभा घेण्यात आल्या आहेत. म्हणून राज्यसभेला सकाळी ९ ते दुपारी एक आणि लोकसभेसाठी दुपारी तीने ते सायंकाळी सात या वेळेत कामकाज होत आहे. आज लोकसभेचे काम सायंकाळी सुरू होणार असून ते रात्री उशीरापर्यंत चालण्याची शक्यता आहे.

१ सप्टेंबरपासून सुरू झालेले हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत चालणार होते. परंतु कोरोना संसर्गामुळे ते वेळापत्रक होण्यापूर्वी ८ दिवस आधीच संपत आहे. अधिवेशनात लोकसभेत नुकतीच जारी करण्यात आलेल्या काही अध्यादेशांची जागा बदलण्यासाठी सादर करण्यात आलेल्या विधेयकांसह अनेक विधेयके लोकसभेत मंजूर झाली आहेत.

Protected Content