फुटबॉलच्या मैदानावर खेळाडू नव्हे तर चाहते भिडले !

जकार्ता-वृत्तसंस्था | इंडोनेशियातील एका फुटबॉल सामन्यानंतर भयंकर घटना घडली असून यात तब्बल १२९ जणांना प्राण गमवावे लागले आहे.

इंडोनेशियातल्या पूर्व जावा या प्रांतातील मलांग शहरात झालेल्या फुटबॉल सामन्यानंतर भीषण हिंसाचार उफाळून आला आहे. कंजुरुहान स्टेडियमवर पेरसेबाया सुरबाया आणि अरेमा फुटबॉल क्लब या दोन संघांमध्ये फुटबॉलचा सामना होता. यात अरेमावर मात करून पेरसेबाया सुरबायाने विजय संपादन केला. हा सामना संपताच अरेमा फुटबॉल क्लबच्या हजारा चाहत्यांनी मैदानावर धाव घेऊन धुडगुस घातला.

या चाहत्यांनी विरोधी संघाचे खेळाडू, समर्थक आणि पोलिसांवर हल्ला चढवला. यामुळे येथे विविध गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची स्थिती निर्माण झाली. यात ३४ जणांची जागीच मृत्यू झाला. तर इतरांनी रूग्णालयात प्राण सोडला. या दुर्घटनेत १२९ जणांचा मृत्यू झाला असून जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. आकस्मीकपणे घडलेल्या या घटनेनंतर लष्करी जवानांनी मैदानाचा ताबा घेतल्याने स्थिती नियंत्रणात आली. मात्र तोवर मोठी भयंकर हानी झाल्याचे इंडोनेशीयासह फुटबॉल विश्‍व स्तब्ध झाले आहे.

Protected Content