क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर ; धोनीच्या कमबॅकची तारीख ठरली !

mahendrasing dhoni

रांची वृत्तसंस्था । भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅककडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात धोनीची संघात निवड करण्यात आली नाही. दरम्यान, आता बांगलादेश विरोधात जाहीर करण्यात आलेल्या टी-20 संघातही धोनीच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे धोनी निवृत्त होणार अशी चर्चा रंगली असताना धोनीच्या कमबॅकची तारिख ठरल्याचं बोललं जात आहे.

दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये महेंद्रसिंग धोनी प्रतिस्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या कसोटी सामन्यात रांची येथे धोनी उपस्थित होता. दरम्यान एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार धोनी सैयद मुश्ताफ अली ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. झारखंड संघाकडून कमबॅक करण्यासाठी धोनीनं ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. जानेवारी 2020मध्ये धोनी सैयद अली स्पर्धेत खेळण्यास सुरुवात करणार आहे. झारखंडच्या वरिष्ठ संघात धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यासाठी धोनी आतापासून राज्य अंडर-23 संघाकडून अभ्यास वर्गाला सुरुवात केली आहे.

Protected Content