चाळीसगावात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून रंगली शब्दसुरांची मेजवानी

chalisagaon mejavani

चाळीसगाव प्रतिनिधी । लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमधुर गीतांच्या शब्दसुरांनी ‘दिवाळी पहाट’ मेजवाणी चांगलीच रंगली आहे.

दिवाळी सण म्हटले की सर्वत्र रंगीबेरंगी रोषणाई, रांगोळी, पणत्या व फराळ आलेच. या व्यतिरिक्त दिवाळी पहाट हा कार्यक्रम खरोखरच मनाला या सणाची खरी ओळख करुन देतो. रामप्रहरी सप्तसूर आपल्या कानी पडल्यावर खरोखरच अगदी मन प्रसन्न होऊन जाते. किशोर गुरव यांनी आपल्या जादूई सुरांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले तर विविधरंगी कलाविष्कार सादर केलेत. विद्या भोई, गायत्री चौधरी, पवन गुरव आदींनी गायनाने उपस्थितांचे मनोरंजन केले. तर ‘माझे माहेर पंढरी’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘आळंदी वंदीन’, ‘विघ्नेश्वर तु वरदविनायका’ यासारख्या गीतांनी दिवाळी पहाट सुरमयी करत, उपस्थितांची मने जिंकलीत.

यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी उपस्थितांना धन्वंतरीची प्रतिमा भेट देण्यात आली. आरोग्याचे जतन या मुख्य हेतूने सण उत्सववादी योजना आपल्या पूर्वजांनी केल्या आहेत, ज्यातला एक म्हणजे दिवाळी असून दिवाळीतील फराळ हा आहार परंपरेचा परिपाक आहे. याचा संबंध खाद्य-संस्कृतीशीही असून मात्र खाण्यापिण्याची चंगळ सांभाळायला हवी. वातावरणाला अनुरुप व बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक काळजी घ्यायला हवी असे डॉ.विनोद कोतकर यांनी मार्गदर्शनपर सांगितले. तर डॉ.प्रवीण भोकरे यांनी थंडीतले निरोगी वातावरण, त्यात मुबलक धनधान्यातून बलवर्धन करणाऱ्या आहारसेवनाचा विचार पूर्वजांनी केला असून हे स्वाभाविक गुण सर्वांनी अंवलबायला हवे असल्याचे सांगितले.

शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करण्याचा हा विचार प्रत्येकाने करायला हवा. समाजातल्या मध्यम व निम्न स्तरातील घरांमध्ये शिरलेल्या मधुमेह, हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्त्व आदी विकारामागे देखील दिवाळीतील फराळांमधील साखर व मैदा हे प्रमुख कारण राहिले असून आहारात याची प्रमाणशीर काळजी घ्यायला हवी असे डॉ.भाग्यश्री शिनकर यांनी सांगितले.

प्रमुख उपस्थितीत
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सुरेश बागड (मालेगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. व्यासपीठावर स्त्री रोग तज्ञ डॉ.विनोद कोतकर, डॉ.प्रविण भोकरे, डॉ.महेश वाणी, रवींद्र शिरुडे, निलेश सोनगिरे, संस्थापक वसंत वाणी, अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव विजय भामरे आदी उपस्थित होते.

यांनी घेतले अथक परिश्रम

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैलास पाखले यांनी केले तर आभार प्रा.बी.आर.येवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भालचंद्र सोनगिरे, अनिल कोतकर, हिरालाल शिनकर, पुरुषोत्तम ब्राह्मणकर, जयवंत कोतकर, सतीश देव, मनोज शिरुडे, रवींद्र अमृतकर, बी.के.वाणी, रवी अमृतकर, केशव गोल्हार, अशोक गोल्हार, दिलीप येवले, प्रकाश अमृतकर, हरिचंन्द्र पिंगळे, श्रीधर फुलदेवरे, गजानन कोतकर, प्रशांत बागड आदींनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content