जिन्ना यांच्या मतदार संघात शिवसेनेचा झेंडा

yamini jadhav

मुंबई, वृत्तसंस्था | भायखळा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी नवा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच शिवसेनेने भायखळयाची ही जागा जिंकली आहे. हा मतदारसंघ १९४६ साली पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी निवडणूक जिंकली होती. या विजयामुळे यामिनी जाधव यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या यामिनी जाधव या माजी नगरसेविका आहेत. त्यांना एकूण ५१ हजार १८० मते मिळाली. त्यांनी एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचा तब्बल २०,०२३ मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे मधु चव्हाण २४,१३९ मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिले. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी सुद्धा अखिल भारतीय सेनेच्या तिकीटावर निवडूणक रिंगणात होत्या. त्याही पराभूत झाल्या आहेत. यामिनी जाधव यांना एकूण ४१ टक्के मते मिळाली. त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. भायखळा विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. शिवसेनेचे अरविदं सावंत इथून खासदार आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली आहे.

Protected Content