राहूल गांधी यांनी घेतली इष्टलिंग दीक्षा !

बंगळुरू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी यांनी आज चित्रदुर्ग येथील श्री मुरूगा मठात लिंगायत पंथाची इष्टलिंग दीक्षा घेतली आहे.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहूल गांधी हे आज कर्नाटक दौर्‍यावर होते. याप्रसंगी त्यांनी चित्रदुर्ग येथील श्री मुरूगा मठाला भेट दिली. या संदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. श्री जगद्गुरु मुरुगराजेंद्र विद्यापीठाला भेट देणे आणि डॉ. श्री शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांच्याकडून ’इष्टलिंग दीक्षा’ प्राप्त करणे ही अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. गुरु बसवण्णांची शिकवण चिरंतन आहे आणि याबद्दल मठातील शरणारूकडून जाणून घेतली. असं राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.

कर्नाटकात लिंगायत पंथाच्या मतदारांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये तेथे विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्‍वभूमिवर कर्नाटकाला दिलेली भेट आणि लिंगायत पंथाची इष्टलिंग दीक्षा घेऊन त्यांनी या समाजाला आपलेले करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: