धरणगावात चंद्रशेखर अत्तरदे यांची भव्य प्रचार रॅली

77ba1695 9344 4d1c 9b20 1c1d7fd97370

धरणगाव  (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ धरणगावात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी शहरासह तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज दिनांक १२ ऑक्टोबर सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरातील विविध भागातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासह सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी धरणगाव तालुका अध्यक्ष संजय महाजन, शिरीष बयस, पुंडलिक वऱ्हाडे, भाजपा गटनेते कैलास माळी, शहरध्यक्ष सुनिल वाणी, भाजपा तालुका सरचिटणीस सुनिल चौधरी, भाजपा धरणगाव मीडिया प्रमुख टोनी महाजन, नगरसेवक गुलाब मराठे, ललित येवले, सचिन पाटील, कांतीलाल माळी, भालचंद्र माळी, शरद अण्णा, राजेंद्र येवले, शेखर पाटील, कन्हैय्या रायपूरकर आदि उपस्थित होते.

Protected Content