महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर पंतप्रधान मोदींनी केली स्वच्छता

modi

महाबलीपूरम वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबवली. यासंदर्भात मोदींनी स्वत: व्हिडिओ शेअर करत लोकांना स्वच्छतेविषयी जागरुक राहण्याचा संदेश दिला. मोदी म्हणाले की, स्वच्छता असेल तरच आपण स्वच्छ आणि फिट राहू शकतो.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवली होती. स्वच्छता मोहीम राबवण्यसाठी ते स्वतः रस्त्यावर उतरताना अनेकदा दिसले आहेत. आज पुन्हा एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर कचरा दिसताच मोदींनी स्वच्छता मोहीम राबवली. मोदींनी स्वच्छता मोहिमेचा व्हिडीओ आपल्या ट्विटरव्दारे शेअर केला आहे. या व्हिडीओत महाबलीपूरमधील समूद्र किनाऱ्यावर पडलेला कचरा एका पिशवीत भरून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवताना मोदी दिसत आहेत. आज सकाळी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले असतांना त्या ठिकाणी त्यांना कचरा दिसला. त्यामुळे त्यांनी इतराना न सांगता स्वतःच सफाई करण्याचे ठरवले. समुद्र किनाऱ्यावर पडलेला कचरा त्यांनी एका पिशवीत भरायला सुरुवात केली. बीचवर 30 मिनिटांची स्वच्छता मोहीम केली. बीचवरुन उचललेला कचरा हॉटेलचे स्टाफकडे दिला. सार्वजनिक स्थळ स्वच्छ राहावे, यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. यासोबतच त्यांनी लोकांना फिट आणि निरोगी राहण्याचा संदेश दिला आहे.

Protected Content