खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेसह राऊत यांची फजिती- छत्रपती संभाजीराजे

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | पुरेसे संख्याबळ आणि मतांचा कोटा असल्याचा आव आणणाऱ्या शिवसेनेसह खा. संजय राऊत यांची फजिती झाली असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी संत  तुकारामांच्या ‘फजित तो खोटा शीघ्र होय’, या ओळींमधून व्यक्त केली आहे.

राज्यसभेसाठी आतापर्यत सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, त्यानुसार यावेळी देखील अपक्ष उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने पाठींबा द्यावा, असा प्रस्ताव छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची भेट घेत दिला होता.

परंतु शिवसेना व संजय राऊत यांनी पाठिंबा देण्याचे नाकारत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट घालत आमची ४२ मते अपक्ष उमेदवाराला का द्यावी ? असे म्हणून पक्षाचा उमेदवार उभा केला. हे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.
सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होऊन त्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभवानंतरच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीराजे यांनी आज संत तुकारामांच्या अभंगातील वाणीद्वारे ट्वीट केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!