Home Cities भुसावळ SIR उपक्रमाला वेग ; मंत्री संजय सावकारे यांच्या चार विभागांतील चर्चासत्रांत कार्यकर्त्यांच्या...

SIR उपक्रमाला वेग ; मंत्री संजय सावकारे यांच्या चार विभागांतील चर्चासत्रांत कार्यकर्त्यांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण

0
10

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या विशेष उपक्रमाच्या (SIR) पार्श्वभूमीवर भुसावळ मतदारसंघात विविध स्तरांवरील नियोजन बैठका आणि चर्चासत्रांना वेग आला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी मतदारसंघातील चार प्रमुख विभागांमध्ये बूथस्तरीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत SIR उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या चर्चासत्रांमध्ये कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विविध अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या बैठका भुसावळ उत्तर, भुसावळ दक्षिण, ग्रामीण पूर्व आणि ग्रामीण पश्चिम अशा चार विभागांत पार पडल्या. भुसावळ उत्तर विभागाचा मेळावा लोणारी हॉल येथे, दक्षिण विभागाचा मेळावा माळी हॉलमध्ये, ग्रामीण पूर्व विभागाचा मेळावा बोरोले मळा येथे, तर ग्रामीण पश्चिम विभागाचा मेळावा कुऱ्हा येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. या बैठकींना बूथ प्रमुख (BLA-2), माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्रादरम्यान मंत्री संजय सावकारे यांनी प्रत्येक विभागातील बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत मतदार नोंदणी प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. मतदार नोंदणीचे अर्ज भरताना, कागदपत्रांची पूर्तता करताना तसेच प्रशासकीय प्रक्रियेत उद्भवणाऱ्या तांत्रिक व स्थानिक अडचणींबाबत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे SIR उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. बूथस्तरावर अधिकाधिक पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये आणि प्रत्येक बूथ अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बूथ प्रमुखांनीही आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले.मंत्री संजय सावकारे यांनी सूक्ष्म नियोजन, सातत्यपूर्ण संवाद आणि स्थानिक पातळीवरील समन्वयाच्या माध्यमातून SIR उपक्रमाला गती देण्यावर भर दिला. मतदार नोंदणी आणि बूथ सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत भुसावळ मतदारसंघ प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


Protected Content

Play sound