मोदींच्या ‘त्या’ भाषणामुळे खूप वाईट वाटले ; रामकृष्ण मठात नाराजी

images 5

 

कोलकाता (वृत्तसंस्था) स्वामी विवेकानंद जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेलूर येथील रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादस्पद विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचे बघून खूप वाईट वाटले, अशा शब्दात साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे. मठात झालेल्या भाषणात मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधकांवर टीका केली होती.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर होते. मोदींनी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने मोदींनी विवेकानंदांनी तपश्चर्या केलेल्या बेलूर येथील रामकृष्ण मिशनच्या मठाला भेट दिली होती. यावेळी मोदींनी उपस्थितांशी संवाद साधतांना सुधारित नागरिकत्व कायद्यावर भूमिका मांडत विरोधकांवर टीका केली होती. परंतु मोदींच्या भाषणातील याच मुद्द्यावर मठात नाराजी व्यक्त होत असल्याचे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. या वृत्तानुसार अनेकांनी भाषणाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यात प्रामुख्याने स्वर्गीय स्वामी आत्मस्थानानंद यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या मिशनचे सदस्य गौतम रॉय म्हणाले, “राजकारणाशी कोणताही संबंध नसलेल्या रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादास्पद असलेल्या विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचे पाहून खूप दु्ःख वाटले,असे ते म्हणाले. तसेच रामकृष्ण मिशनची दीक्षा देण्याची एक अधिकृत प्रक्रिया आहे आणि मोदींनी दीक्षा घेतलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय अंगाने बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. अशाच मुद्यावरून रामकृष्ण मिशनला मागील वर्षी राजकीय वादात ओढण्यात आले होते. मिशन ही अराजकीय संस्था आहे,” असेही ते म्हणाले.

मोदींच्या भाषणाविषयी बोलताना रामकृष्णच्या एक विद्यार्थी म्हणाला, मोदींची भेट रद्द करण्याची बेलूर मठ प्रशासनाला विनंती केली होती. लोकांसमोर अडचणी निर्माण करणाऱ्या माणसांना बोलवायला नको, असे माझे मत होते. तर मठाचे सचिव स्वामी सुविरनंदा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी केलेल्या भाषणावर काही मत व्यक्त करायचे नाही. ही अराजकीय संस्था आहे. आम्ही घर सोडून इथे आत्मसंवादासाठी आलो आहोत, असे ते म्हणाले.

Protected Content