राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्षांना धमकी; तिघांच्या विरोधात तक्रार

मुक्ताईनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांना सोशल मीडियासह कॉल करून धमकी दिल्या प्रकरणी त्यांनी मुक्ताईनगर येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर येथील शिवराज पाटील हे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलच्या जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.  दि २ ऑक्टोबर रोजी जामनेरचे भाजप आमदार गिरीष महाजन यांनी लाइव्ह ट्रेंडस न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील एका वाक्याला अनुसरून शिवराज पाटील यांनी  २/१०/२०२१ रोजी १.५० मिनिटला त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ”गिरीशभाऊ म्हणतात मुक्ताईनगरचे आमदार आमचे म्हणजे भाजपाचे एकूण १०७ समजायचे का आता ?” अशा आशयाची पोस्ट अपलोड केली होती.

या पोस्टवर प्रकाश गोसावी रा.मुक्ताईनगर; मितेश पाटील रा.शेमळदा;  आणि अक्षय पाटील रा.वरणगांव याने त्यांच्या मोबाईलवरून शिवराज पाटील यांना कॉल करून धमकी दिली. तसेच या पोस्टवर लेखी स्वरुपात धमकी दिली आहे. तसेच तुम्ही अश्या स्वरूपाच्या पोस्ट करणे सुद्धा बंद करा, नाहीतर तुम्हाला कळेलच काय होईल ते असे देखील नमूद केले होते.

यानंतर सुमारे ४०ते ५० अनोळखी लोकांनी शिवराज पाटील यांना सतत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांचे नाव घेऊन जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. तरी माझे अथवा माझ्या परिवारातील सदस्यांच्या जीवाचे काही एक बरे वाईट झाल्यास वरील व्यक्ती व त्यांचे  ४०-५० समर्थक लोक जबाबदार राहतील व त्यांनाच जबाबदार धरण्यात यावे. असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तसेच वरील लोक  हे सतत शिवराज पाटील यांच्या  घराकडून मोटर सायकलींवर ट्रिपल सीट बसून येऊन जोर-जोरात होर्न वाजवून शिवराज पाटील यांना घाबरवत असतात असे या तक्रारीत म्हटले आहे.

या अनुषंगाने प्रकाश गोसावी, मितेश पाटील, अक्षय पाटील यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे असे शिवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी या आशयाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे सुद्धा लेखी तक्रार केली आहे

 

Protected Content