ह्यूस्टन, अमेरिका । एक आठवड्याच्या अमेरिके दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनर्जी सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्यूस्टनमध्ये तेल क्षेत्रातील सीईओंसोबत पहिली बैठक पार पडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमेरिकेतील टेक्सास राज्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या ह्यूस्टनमधील जॉर्ज बुश आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्रेड अॅण्ड अफेअर्सचे संचालक क्रिस्टोफर ओल्सन यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. या वेळी अनेक अमेरिकी अधिकारी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. पंतप्रधांनी सर्वांशी हस्तालोंदन केले. ऊर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिकेदरम्यानचे सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.