…अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल – आशिष शेलार

मुंबई प्रतिनिधी । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आतापर्यंत राज्य सरकारने लपवाछपवी केली. यापुढे सहकार्य करा, अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने त्याचे पालन आणि मदत करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला काही प्रश्न विचाले आहेत.

आशिष शेलार म्हणाले कि, ‘पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!’ ‘सिंघम’चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक, ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही? कुणी, मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात. पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला.याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आतापर्यंत राज्य सरकारने लपवाछपवी केली यापुढे सहकार्य करा अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Protected Content