मनवेल येथील ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन सभा तहकुब

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल ग्रामपंचायतीतर्फे मंगळवारी (दि.१०) आयोजित केलेल्या ऑनलाईन ग्रामसभेला ग्रामस्थानी सहभागी न झाल्याने ग्रामसभा कोरम अभावी ही सभा तहकुब करण्यात आली.

शासनाच्या माध्यमातुन राबवविण्यात येत असलेली ऑनलाईन ग्रामसभा ही संकल्पना ग्रामीण भागातील लोकांना नवीन असल्याने किंवा याबाबत ग्रामीण पातळीवर सविस्तर माहिती उपलब्ध  नसल्याने केवळ २७ ग्रामस्थांनीचयात प्रत्यक्ष सहभागी झाले त्यामुळे कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात येत असल्याचे ग्रामसेवक भरत पाटील यांनी जाहीर केले. 

गेल्या दोन वर्षापासुन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाने कोवीड १९ करिता संचारबंदीची नियम लावल्याने अनेक प्रलंबीत प्रश्न आता संचारबंदी शिथील झाल्याने  सर्वच क्षेत्रात सामाजिक अंतराच्या वापर करून सभा घेणे, सेमिनार,अभ्यास वर्ग घेतले जात आहेत. याच पद्धतीने ” पोखरा ” योजनाच्या लाभ शेतकऱ्यांना मिळावा, म्हणून आँनलाईन ग्रामसभा घेण्याची परवानगी शासनाने दिल्याने मनवेल ग्रामपंचायतीच्या वतीने येथे आँनलाईन ग्रामसभा  आयोजित करण्यात आली होती. मात्र ती कोरम अभावी तहबुत करण्यात आली.

“पोखरा” योजनाच्या योजना शेतकऱ्यांना मिळावा म्हणून कृषि संजवीणी समिती गठीत करण्यासाठी आँनलाईन ग्रामसभा आयोजित करण्यात आली, यासाठी तीस मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता.

तीस मिनिटांच्या कालावधीत कृषि संजीवनी समीती गठीत करण्या बाबत सर्व विषयांची माहिती देण्यात आली.  लोकसंख्येच्या पंधरा टक्के किंवा कमीत कमी शंभर लोकांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु ऑनलाईन मिटिंग किंवा ग्रामसभा ही कार्यप्रणाली ग्रामीण भागातील लोकांसाठी नवीन किंवा कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असलेल्या लोकांना यामध्ये फारसा रस नसल्याने किंवा या ऑनलाईन सभेसाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे ॲप अशा संगणकीय प्रणालीची माहिती ग्रामस्थानां माहिती अपुर्ण असल्याने या सभेला ऑनलाईन उपस्थित राहता न आल्याने अनेक ग्रामसभेला कोरम पूर्ण झाला नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली.

आँनलाईन ग्रामसभेची लिंक व्हाँटसप गृपवर व गावातील शेतकऱ्यांच्या व्हाँटसप वर पाठविण्यात आली होती मात्र पाहीजे तेवढा प्रतिसाद लोकांनी दिला नसल्याचे दिसुन आले.

 

Protected Content