जळगाव प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी आजची निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून २७ मे रोजी निवड करण्यात येणार आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांनी आपला ठरवून दिलेला कार्यकाळ उलटून गेल्यानंतरही राजीनामा न दिल्यामुळे त्यांच्यावर १७ पैकी १५ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यामुळे ते पायउतार होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र अविश्वासाला सामोरे जाण्याआधीच लकी टेलर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या अनुषंगाने आज बाजार समितीच्या सभागृहात नवीन सभापतींची निवड करण्यासाठी विशेष सभा घेण्यात येणार होती. तथापि, आजची सभा पुढे ढकलण्यात आली असून ही निवड आता २७ मे रोजी होणार आहे.