जळगावातील अज्ञात चोरट्यांनी फोडले किराणा दुकान

जळगाव प्रतिनिधी । शहरातील के.सी.पार्क परीसरातील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून हजार रूपयांचा मुद्देमाल साहित्य चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सैय्यद अय्युब (रा. सुरेशदादा जैन नगर) हे कुटूंबासह वास्तव्यास आहे. त्यांचे के.सी.पार्क परिसरातील शंभर फुटी रस्त्याजवळ किराणा दुकान आहे़ यातूनच ते कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात़ लॉकडाउनच्या काळात प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेच्या निर्बंधानुसार सैय्यद अय्युब हे रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवतात़ शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद करून घरी निघून गेले़

सैय्यद अय्युब यांच्या आई बी या रविवारी सकाळी ६ वाजता घराबाहेर आल्यानंतर काही अंतरापर्यंत मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. दुकानाजवळून जात असताना त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी त्वरित मुलगा सैय्यद अय्युब याला दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली़. काही वेळातच मुलगा दुकानात आल्यानंतर त्याला कुलूप तुटलेले आणि दुकानातील शेव पाकीट, चहा पावडर, चिक्की ठेवलेली बरणी, चिवड्याचे पाकिट, पाण्याच्या बॉटल्स् आदी सुमारे एक हजार रूपयांचा किराणा साहित्या चोरीला गेल्याचे दिसून आले़ त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content