बसपाला मत द्यायच्या आधीच भाजपाच्या पोलिंग एजंटने कमळासमोरील बटण दाबले

haryana
haryana

haryana
 

फरिदाबाद (वृत्तसंस्था) हरयाणामधील फरिदाबाद येथील असावटी गावात काही महिला मतदान करत असताना भाजपाच्या पोलिंग एजंटने जबरदस्तीने मतदान कक्षात गेला आणि कमळचे बटण दाबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महिलांनी आम्हाला बसपाला मत द्यायची होती. परंतू जबरीने भाजप पोलिंग एजंटने कमळचे बटन दाबल्याचा आरोप केलाय. या संदर्भात व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर तेथे आता फेरमतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून पोलिंग एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. तर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील अधिकारी अमित अत्री यांना निलंबित केले आहे.

 

 

या संदर्भात अधिक असे की, लोकसभा निवडणुकीत फरिदाबादमध्ये 12 मे रोजी मतदान पार पडले. असावटी गावातील एक मतदान केंद्राचा परिसर हा दलितबहुल असून या भागातील मतदार बहुजन समाज पक्षाला मतदान करतात. दरम्यान, याठिकाणी या मतदान केंद्रावर भाजपाकडून गिरीराज सिंह याला पोलिंग एजंट नियुक्त करण्यात आले होते. गावातील 23 वर्षांच्या विवेचना या तरुणीने समोर येत आरोप केलाय की, 12 मे रोजी मतदान केंद्रावर ‘मी बुथ क्रमांक 88 येथे रांगेत उभी होती. तासभर मी रांगेत होती. मी मतदान कक्षात गेल्यावर ईव्हीएमवर बसपाचे चिन्ह (हत्ती) शोधत होते. पण अचानक भाजपाचा पोलिंग एजंट तिथे आला आणि त्याने कमळासमोरील बटण दाबले. मी त्याला जाब विचारला, पण त्याने उत्तर देणे टाळले’. गावातील अन्य महिला मतदारांनीही गिरीराजनेच कमळासमोरील बटण दाबल्याचा आरोप केला आहे. भाजपाच्या पोलिंग एजंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. काही व्हिडिओमध्ये तो मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून गिरीराज सिंहला अटक देखील करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. या मतदान केंद्रावर आता 19 मेरोजी फेरमतदान होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here