जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील जुन्या अपार्टमेंटला एकच नळ कनेक्शन देण्याच्या निर्णयाला मनसेने विरोध केला आहे. निर्णयाविरोधात मनसेने अनोखे नळ-तोटी आंदोलन महापालिका आवारात करण्यात आले. नळ कनेक्शन संदर्भात आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले.
मनसेच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात वीस ते पंचवीस वर्षे जुने शेकडो अपार्टमेंट आहेत. त्यामधील प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र नळजोडणी आहे. त्या पद्धतीने प्रत्येक फ्लॅट धारकांना स्वतंत्ररित्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. नुकतेच अमृत योजनेची नवीन जलवाहिनी संपूर्ण शहरात टाकण्यात आली आहे. त्यात नवीन जलवाहिनीवरून जुन्या नळांना स्वतंत्ररित्या जोडणी करून द्यावी, अशी मागणीचे अनेक अर्ज महानगर पालिकेच्या प्रशासनाला देण्यात आले आहे. दरम्यान महानगर पालिका प्रशासनातर्फे जुन्या आपार्टमेंटला पूर्वीप्रमाणे नळ कनेक्शन न देता एका अपार्टमेंटला एकच कनेक्शन देण्याच्या तोंडी सुचना दिले जात आहे.
अमृत पाणीपुरवठा योजनेची नवीन नळ जोडणी केल्याशिवाय जुने नळ जोडणी तोडण्यात येऊ नये, ज्या आपार्टमेंट धारकांची जुनी नळ जोडणी तोडली व नवीन दिली नाही, त्यांना पुन्हा निवड जोडणी करून द्यावी. पाणीही मूलभूत हक्क असून त्यापासून कोणालाही वंचित ठेवू नये व त्यांच्या मानवी हक्काची पायमल्ली करू नये. अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत संपूर्ण शहरात पाईपलाईन टाकण्यात आलेले आहे, त्या पाइपलाइनची वहन क्षमता व पाण्याच्या दबावाची तपासणी करून तसे रेकॉर्ड दत्तरी ठेवल्याशिवाय कोणतेही जुने नळ कनेक्शन बंद करू नये. या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने जळगाव महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले. या निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/542251590695399