गुटखासह पान मसाला विक्री करणाऱ्यांवर कारवाई

शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हे दाखल ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैधरित्या गुटखा, पान मसाला तंबाखूची विक्री व साठवणूक करणाऱ्या तीन ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी २१ जून रोजी सकाळी छापा टाकून सुमारे २८ हजार ९५३ रूपये किंमतीचा मुद्देमाल हास्तगत करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा तीन जणांविरोधता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या गुटखा, पान मसाला, गोड सुपारी, तंबाखू आदींची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २१ जून रोजी सकाळी ११.३० वाजता छापा टाकला. यात जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील जे.के. पान सेंटर, रेल्वे स्टेशनजवळील महानगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स मधील दोस्ती पान सेंटर आणि एका दुकानावर छापा टाकला. तीन ठिकाणाहून पथकाने सुमारे २८ हजार ९५३ रुपये किंमतीचा सुगंधित पान मसाला, तंबाखू गुटखा, सुपारी आदी मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड (वय-४२) यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी २१ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात संतोष एकनाथ शेळके (वय-४९) रा. शाहूनगर, शरद भागवत पाटील (वय-४४) रा. वाघ नगर आणि रमेश तानाजी पाटील (वय-६२) रा. गणेश कॉलनी या तीन जणांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!