घरकुल घोटळ्याचा आज निकाल; पोलीसांचा चोख बंदोबस्त (व्हिडीओ)

dhule2

धुळे/जळगाव प्रतिनिधी । बहुचर्चित 45 कोटींचा जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल असल्यामुळे निकालाची उत्सुकता जळगावकरांना लागली आहे. निकालानंतर कोणताही अनुचित धुळे जिल्हा न्यायालय परीसरात पोलीसांची चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आता निकाल काय लागतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. या घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री, माजी आमदार सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा या संशयितांना झाल्यास त्यांना निवडणूक लढता येणार नाही. या घरकुल घोटाळा प्रकरणात 57 संशयितांनी विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आठ संशयितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित 49 संशयितांच्या भविष्याचा फैसला होणार आहे. 45 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी घरकुल घोटळ्याचा आज निकाल येणार आहे.

 

Protected Content