आमदार किशोर पाटील यांना देखील कोरोनाची लागण

पाचोरा प्रतिनिधी । आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठोपाठ पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांनी सोशल मीडियातून याबाबत माहिती दिली आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झाला आहे. आज त्यांनी स्वत: आपल्या फेसबुक पेजवरून याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, मंगेश चव्हाण यांच्या पाठोपाठ पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना देखील याचा संसर्ग झाला आहे.

आमदार किशोर पाटील यांनी फेसबुक पेजवरून याबाबतची माहिती दिली आहे. यानुसार काल रात्री ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आला आहे. आपल्यावर उपचार सुरू असून प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आपल्या संपर्कात गत आठ दिवसात जे आले असतील त्यांनी चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

आमदार किशोरआप्पा पाटील यांनी खाली नमूद केल्यानुसार पोस्ट शेअर केली आहे.

Protected Content