कोरोनाच्या प्रतिकारात योगदान देणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मान

रावेर प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमध्ये अहोरात्र परिश्रम करणार्‍या कर्मचार्‍यांचा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना काळात येथील तहसील कार्यालय व तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचा तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बोलतांना डॉ. अजित थोरबोले म्हणाले की, गत पाच महिन्यांपासून कोरोनाशी लढा देत नागरिकांमध्ये खर्‍या अर्थाने प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी केलेल्या काम व जनजागृतीमुळेच तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यात यश आलेले आहे. सर्वच कर्मचार्‍यांनी मनापासून जबाबदारी पार पडल्याने याचे श्रेय सर्वांचे असून हे सांघिक यश आहे असे विश्‍वास प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसिलदार सौ देवगुणे, निवासी नायब तहसिलदार संजय तायडे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, नगरपालिका मुख्याधिकारी रविंद लांडे, नायब तहसीलदार कविता देशमुख, सी जी पवार, एन. जे. खारे, एपीआय शीतलकुमार नाईक, पीएसआय मनोज वाघमारे उपस्थित होते.

कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम करणार्‍या महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांचा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार उषारानी देवगुणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शहरात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबविल्याबद्दल सर्वप्रथम पालिका मुख्याधिकारी लांडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, अव्वल कारकून, लिपिक व इतर कर्मचार्यांसह तालुक्यातील सर्व तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा सन्मान सन्मानपत्र देऊन करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित कर्मचार्‍यांची कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात आली.

Protected Content