एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

मुक्ताईनगर प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक आज पार पाडली. यात माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या २ सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्या बाबत नियोजन बैठक आणि संघटनात्मक आढावा घेण्यात आला. ही बैठक पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, माजी आमदार अरुण दादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,युवक जिल्हा अध्यक्ष रविंद्र नाना पाटील,प्रवक्ता योगेश देसले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.

यात एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक २८ रोजी कुर्‍हा काकोडा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. तर २ सप्टेंबर रोजी डॉ. बी. सी. महाजन यांच्या तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी एकनाथराव खडसे हे संघटनशील नेतृत्व असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी कार्यक्रमासोबत तालुक्यात गावोगावी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शाखा उघडाव्या असे आवाहन केले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील यांनी येत्या महिन्यात संघटन आठवडा हा उपक्रम राबविण्यात येईल व तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शाखा स्थापन करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील म्हणाले लोकनेते एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस आपल्याला लोकउपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करायचा आहे तसेच आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्ष संघटन मजबूत करायचे आहे येत्या आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या दृष्टीने गाव तेथे शाखा स्थापन कराव्यात व प्रत्येक गावातील बुथ प्रमुखांची नियुक्ती करावी तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार तर्फे विविध जनहिताच्या योजना राबविण्यात येत आहेत त्याचा सामान्य जनतेला व लाभार्थ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाभ मिळवून द्यावा अशा सूचना केल्यातसेच आज नियुक्त्या करण्यात आलेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी पक्षाचे काम जोमाने करावे व पक्ष संघटन वाढवावे तसेच जे लोक पक्षाची पदे घेऊन बसले असतील व पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टीने काम करत नसतील त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा असे सांगितले.

या बैठकीला जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, दूध संघ संचालक सुभाष टोके,युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, पं.स. सभापती सुवर्णा साळुंखे, उपसभापती सुनिता ताई चौधरी, लताताई सावकारे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजनाताई कांडेलकर, महिला आघाडी शहराध्यक्ष निता पाटील, शहराध्यक्ष राजू माळी,युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, माजी पं. स. सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील,सोशल मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील,भागवत पाटील, डॉ. बी.सी. महाजन, संदिप देशमुख,चंद्रकांत बढे,अनिल झोपे,अतुल युवराज पाटील, किशोर चौधरी,लिलाधार पाटील, रवींद्र पाटील,शेषराव पाटील, विकास चौधरी,ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिवा पाटील, साहेबराव पाटील, कैलास पाटील,रवींद्र दांडगे,रणजित गोयनका यांची उपस्थिती होती.

Protected Content