मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील खडसे विद्यालयात मानसरंग क्लबच्या माध्यमातून परीक्षा व ताण या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आजच्या धावपळीच्या युगात परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना ताणाला सामोरे जावे लागत असते. याच प्रतिकार करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. टी. चौधरी हे होते.
अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवसांमध्ये ताण न घेता होकारार्थी विचार करून अभ्यास करावा. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. छाया ठिगळे (मानसशास्त्र विभाग प्रमुख) याने मार्गदर्शन करताना परीक्षा आणि ताण यांचा जवळचा संबंध आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवसांमध्ये आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. यासाठी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य ध्यान, योगा, प्राणायाम, व्यायाम, करणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. ए. महाजन, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए.पी. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. टी .चौधरी यांनी सहकार्य केले. प्रा. हुसे सर प्रा. देशमुख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.आर. डी. येवले यांनी मानले.