सामाजिक वनीकरण विभागातून शेकडो वृक्षांची कत्तल

साकेगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या तापी नदीच्या काठावरील सामाजिक वनीकरणाच्या विभागातून शेकडो वृक्षांची कत्तल होत असल्याचे दिसून येत असून या प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

साकेगाव पासून सुमारे दीड किलामीटर अंतरावर तापी नदीच्या काठावर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तापी नदीच्या तीरावर दीडशे ते २०० एकरवर सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे सर्रास दिवसा रात्री सर्वात हिरवेगार आणि डोळेदार वृक्षांची कत्तल सुरू आहे. यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकार्‍यांचे हात मोठ्या प्रमाणात ओले होत असल्यामुळे ते कुठल्याही अवैध वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील वृक्ष प्रेमींनी केला. आहे.

या बेसुमार कत्तलीमुळे या परिसरातील वनराई नष्ट होण्याचा धोका आहे. विशेष करून तसेच हिरवीगार वृक्ष सर्रासपणे साकेगाव सह परिसरात दीडशे ते २०० वीट भट्टी व्यवसायिक असून ते दररोज पेट्रोलवर चालणार्‍या मशीनच्या माध्यमातून रात्री आणि दिवसा सर्वास मोठ्या हिरव्यागार झाडांची कत्तल करत असतात. ही तोडलेली लाकडे ट्रॅक्टरच्या माध्यमातून अनेकांना विकत असतात. यात एक ट्रॅक्टरची ट्रॉली साधारणतः सहा ते सात हजार रुपयाला तर एक बैलगाडी एक ते पंधराशे हजार ते पंधराशे रुपयाला जात असते त्यामुळे या वृक्षतोड माफियांमधून अधिकार्‍यांना सुद्धा यातून महिन्यासाठी मोठी रक्कम मिळत असल्याचे वृक्षप्रेमी मधून बोलले जात आहे.

तापी काठावरील वनराई उध्वत झाल्यास तेथील प्राण्यांच्या अस्तित्वावरच गंडांतर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने आणि विशेष करून वन खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Protected Content