Home Cities यावल विशाखा महाजन सेट परीक्षा उत्तीर्ण

विशाखा महाजन सेट परीक्षा उत्तीर्ण

0
81

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकतीच घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) परिक्षेचा निकाल जाहिर झाला असून, येथील धनाजी नाना महाविद्यालयमधील गणित विभागातील प्रा. विशाखा महाजन यांनी गणित विषयात यश संपादित केले आहे.

प्राध्यापकांनसाठी आवश्यक आसनारी पात्राता परिक्षा म्हणून सेट परीक्षा आहे. सेट ही पात्राता परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर चौधरी, उपप्राचार्य अनिल सरोदे, उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे, उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य डी. बी. तायडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आणि सर्व मित्र व नातेवाईक सर्वांनीच अभिनंदन केले.

विशाखा महाजन हिने आपल्या या यशाबद्दल बोलतांना आई प्रज्ञा महाजन व वडील अविनाश महाजन यांनी मोलाचे सहकार्य व प्रेरणा दिली. तसेच प्रा. पी. बी. पाटील, प्रा. एच. जी. नेमाडे, प्रा. डॉ. पी. एम. सोनवणे आणि प्रो. डॉ. जी. एस. मारतळे यांनी मार्गदर्शन केले.

 


Protected Content

Play sound