थकीत मानधनासह विविध मागण्यांसाठी आशा व गट प्रवर्तकांचे निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आशा व गट प्रवर्तक यांच्या थकीत मानधन, मोबदला आणि प्रलंबित मागण्यांसाठी गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अर्थात सीटूच्या वतीने महापालिका समोर निदर्शने करण्यात आली व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

सीटूच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महापालिका अंतर्गत आरोग्य विभागातील दवाखान्यात कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची घरोघरी जावून सेवा करण्याचे काम करणाऱ्या आशा वर्कर्स व गट प्रवर्तक यांना नोव्हेंबर पासून सुरू केलेला जोखीम भत्ता मार्च नंतर बंद करून नये, आरोग्य खात्याच्या बजेटमध्ये आरोग्य खात्यावरील खर्चात वाढ करावी, आशांना कायम योजना कर्मचारी म्हणून कायम सेवेत घेण्यात यावे, कोरोना काळात मयत झालेल्या आशांना ५० लाखांची आर्थीक मदत करावी, आशा व गट प्रवर्तकांना आरोग्य कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, थकीत पगार तातडीने अदा करावे, जुलैपासूनचा वाढीव व जोखीम भत्ता अदा करावा यासह विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतीने गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी जळगाव महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी प्रविण चौधरी, शारदा ताढे, विजय पवार यांच्यासह आशा व गट प्रवर्तक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content