राज्यात लवकरच येणार मोठा प्रकल्प : उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एयरबसचा प्रकल्प हा एक वर्षापूर्वीच गुजरातमध्ये गेला होता असा दावा करत राज्यामध्ये यापेक्षा लवकरच मोठा प्रकल्प येणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा टाटा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण तापले आहे. दरम्यान, नागपुरात येणारा एअरबस प्रकल्प हा वर्षभरापूर्वीच गुजरातला नेण्याचा निर्णय झाल्याची माहिती स्वत: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वाहिनीला दिली आहे.

यात उदय सामंत म्हणाले की, या प्रकल्पाबाबत मी एका मुलाखतीत नक्कीच उल्लेख केला होता की हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु. पण त्यानंतर माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की २१ सप्टेंबर २०२१ रोजीच याचा एमओयू झालेला होता. म्हणजेच वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे निश्चित झालेलं होतं. याची कागदपत्रेही आपल्याला बघायला मिळतील. मी ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी असं लक्षात आलं की, याबाबत कुठेही पत्रव्यव्हार झालेला नाही. आरोप-प्रत्यारोप करण्यामध्ये काही अर्थ नाही. वेदांताच्या बाबतही हेच झालं. दरम्यान, पुढच्या पाच ते सहा महिन्यात एक खूप मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी याप्रसंगी केला आहे.

Protected Content