Home Uncategorized खर्दे-खेडी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सर्जेराव पाटील, तर व्हाईस चेअरमन पदी रेखाबाई...

खर्दे-खेडी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सर्जेराव पाटील, तर व्हाईस चेअरमन पदी रेखाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

0
114


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खर्दे-खेडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे निकटवर्तीय सर्जेराव पाटील यांची, तर व्हाईस चेअरमन पदी रेखाबाई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडीवेळी सोसायटीचे संचालक प्रतिभा मंगललाल पाटील, रोहीदास भटा पाटील, सुभाष भाईदास पाटील, गोटू काशीराम परदेशी, हिमंत शंकर पाटील, रामचंद्र श्रावण पाटील, गोपाल श्रीराम पाटील, विजय रघुनाथ पाटील, संजय निळकंठ पाटील, समाधान गोरख धनगर आणि नाना सीताराम भिल उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली, तर त्यांना सचिव कैलास पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

या विजयानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार अनिल भाईदास पाटील, विश्वास पाटील, किशोर पाटील, प्रवीण पाटील, सुनील पाटील, गुलाब पाटील, चैत्राम पाटील, पदम नाना, जीवन परदेशी, बारकू पाटील, नाटू पाटील, राकेश पाटील, सुदाम पाटील, नगराज पाटील, अशोक पाटील, दीपक पाटील, कन्हैया पाटील आणि बाळू मनोहर पाटील यांच्यासह गावातील व परिसरातील अनेक मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. या निवडीमुळे खर्दे-खेडी परिसरात आनंदाचे वातावरण असून नवनिर्वाचित मंडळ सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound