मराठा समाजाची कायम स्वरूपी आरक्षणासाठी बैठक

रावेर, प्रतिनिधी । कायम स्वरूपी आरक्षण मिळण्यासंदर्भात रावेरात आज मराठा समाजाची महत्वाची बैठक संपन्न झाली. यावर पुढच्या आंदोलना संदर्भात विचार-विनय करण्यात आले. यावेळी बैठकीत येत्या शुक्रवारी सकाळी ११ वा समस्त मराठा समाजातर्फे निवदेन देण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

बैठकीला मराठा समाजाचे डॉ. एस. आर. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती निळकंठ चौधरी, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, संभाजी बिग्रेड तालुकाध्यक्ष घनश्याम पाटील,योगेश पाटील, कडू पाटील, प्रविण पंडीत, जे. के. पाटील, सी. एस. पाटील, सचिन पाटील, गोंडू महाजन, गणेश चौधरी, जयेश पाटील यांच्यासह मोठ्या संखेने मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी येत्या शुक्रवारी मराठा बांधवांनी रावेर कृषी उपन्न बाजार समितीत उपस्थित राहण्याचे अवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content