डॉ. बाबासाहेब आंबेकडर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 6 ते 16 एप्रिल दरम्यान “सामाजिक समता कार्यक्रम” अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय जळगावच्या माध्यमातून  सहायक आयुक्त योगेश पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली राबविले जात आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातुन देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय दिला आहे. त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा व समाजकल्याणच्या योजनेंचा गावपातळिवर माहिती मिळावे, या अनुषंगाने आज दि.10/04/2022 रोजी राजदेहरे सेटलमेंट या ठिकाणी बुध्दविहारात समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी विभागाच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक लाभाच्या योजनेविषयी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी बोध्दाचार्य निवृत्ती बागुल, ज्ञानेश्वर बागुल, युवराज साळवे, देवेश काकाडे, विलास बागुल, सागर बागुल, संदिप बागुल, शिवाजी बागुल, यशवंत जाधव, प्रकाश पवार ऊपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुञसंचालन निवृत्ती बागुल यांनी तर आभार ज्ञानेश्वर बागुल यांनी मानले.

 

Protected Content