सोमय्या पिता-पुत्र फरार : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या हे पोलीस कारवाईच्या भितीने फरार झाले असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोमय्या आणि राऊत यांच्यातील सामना चांगलाच रंगला आहे.  यातच आता राऊत यांनी सोमय्या पिता आणि पुत्र फरार असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, किरीट सोमय्या हे मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली तरी सत्याचाच विजय होईल असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यास, संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर अद्याप तरी किरीट सोमय्या यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

Protected Content