रावण दहन पुतळा बनविण्याची खरारे परिवाराची ख्याती !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा आहे. यादिवशी भले मोठे आणि आकर्षक असे रावण बनविले जातात. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील खरारे परिवार हे गेल्या ५० ते ६० वर्षांपासून रावण बनविण्याचे काम करत असून हा व्यवसाय त्यांचा तीन पिढ्यांपासून सुरू आहे.

दसऱ्याला रावण दहन साठी यांनी बनविलेल्या रावण ची मोठी मागणी आहे. जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात तसेच जिल्ह्याबाहेर देखील भारत खरारे यांनी बनवलेल्या रावणाच्या पुतळ्याला मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पिढीजात व्यवसाय असल्याने खरारे यांनी चांगलीच ख्याती या व्यवसायात कमावली असून अत्यंत सुबक रावणाचा पुतळा बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे.

रावण दहनाच्या तीन ते चार महिन्यापूर्वी रावणाच्या पुतळा बनविण्याच्या कामाला सुरवात केली जात असून महत्वाचे म्हणजे पर्यावरण पूरक वस्तू त्यात बांबू, सुतळी आणि गेरूचा उपयोग करून भला मोठा रावणाचा पुतळा बनविला जातो. याची पुर्ण तयारी करण्यात आली असून या कार्यक्रमाला भुसावळकरांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content