रायसोनी महाविद्यालयाच्या प्रांगणात गरबा-दांडियाचे भव्य आयोजन

हजारोच्या संख्येने विध्यार्थ्यांचा सहभाग, विजेत्यांना विविध पारितोषिके प्रधान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रायसोनी मॅनेजमेंट महाविद्यालय प्रायोजित धम्माल दांडिया – २०२३ मध्ये हजारोच्या संख्येने सहभागी झालेले विद्यार्थी युवक-युवती दांडियाच्या तालावर मोठ्या उत्साहाने थिरकली व उपस्थित पालक, प्राध्यापक आदींनी विध्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाला भरभरून दाद दिली.   संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखालील हा सोहळा अनेकासाठी डोळ्याचे पारणे फेडणाराच ठरला.

पारंपारिक वेशभुषेतील युवक-युवती मोठ्या संख्येने या धम्माल- दांडिया २०२३ मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सौ. यामिनी शाह,  सुरेखा अग्रवाल, भारती रायसोनी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्राचार्या सोनल तिवारी, रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा, प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, एमसीए विभाग प्रमुख प्रा. रफिक शेख, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, एमबीए विभाग प्रमुख कौस्तव मुखर्जी, बीबीए विभाग प्रमुख योगिता पाटील, संगणक व  माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रमोद गोसावी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील,  प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर, डॉ. जितेंद्र जमादार, डॉ. विशाल राणा आदींसह विद्यार्थी युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजेने रंगत आलेल्या या दांडिया महोत्सवामध्ये पारंपारिक वेशभुषेत विद्यार्थी युवक-युवतींच्या ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. यामध्ये जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयासोबतच जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचे दांडियाचे ग्रुप सहभागी झाले होते. या दांडिया नृत्य सोहळ्यात रायसोनी संस्थेतील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याठिकाणी सर्वांसाठी फूड काउंटर्सची सोय देखील करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व प्रमुख संयोजक प्रा. श्रिया कोगटा व वसीम पटेल हे होते तर स्टुडट कॉन्सिलचे विध्यार्थी, प्रा. गणेश पाटील व शीतल जैन यासह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायसोनी इन्स्टिट्यूटच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हे ठरले दांडिया स्पर्धेतील विजेते

या दांडिया स्पर्धेत अक्षय रावलानी याने दांडिया किंग तर साक्षी मिसरानी या विध्यार्थिनीने दांडिया क्वीन हे सर्वोत्कृष्ट विजेतेपद पटकावले, तसेच उत्कृष्ट गरबा स्पर्धेत लोकेश तलरेजा व लक्ष्मी मंधान, बेस्ट दांडिया प्लेयर लकी रामचंदानी व जया मोतीरमानी व सर्वोत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत अर्पित कुकरेजा व दिया बालानी यांना प्रथम बक्षीस मिळाले. तर रायसोनी इस्टीट्युटच्या कर्मचाऱ्यांमधून प्रा. शुभम घोष व प्रा. करिष्मा चौधरी यांना दांडियाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

Protected Content