जळगाव पीपल्स बँकेच्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । सहकारातील आघाडीची बँक म्हणून ख्यात असणार्‍या जळगाव पीपल्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून याचा निकाल २५ एप्रिल रोजी लागणार आहे.

जळगाव पीपल्स बँकेचा निवडणूक कार्यक्रम दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आला. १४ संचालकांसाठी ही निवडणूक होणार असून महापालिका हद्दीतील १२ मतदार संघांचा यात समावेश असून २४ एप्रिल रोजी मतदान होईल. याच्या प्रक्रियेला आता प्रारंभ झाला आहे.

या निवडणूक प्रक्रियेमध्ये १ ते ५ एप्रिलदरम्यान नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकारण्यात येईल. ६ एप्रिल रोजी छाननी, ७ एप्रिल रोजी माघारीची मुदत आहे. १५ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम प्रसिद्ध होऊन २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपासून यशवंतराव मुक्तांगण सभागृहात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. निवडणुकीचा निकाल २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अजिंठा लॉन्स येथे घोषित करण्यात येणार आहे.

जळगाव पीपल्स सहकारी बँकेवर भालचंद्र पाटील यांचे एकछत्री वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्यांना कुणी आव्हान देण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.

Protected Content