अंकलेश्वर – बुऱ्हाणपुर रस्ता दुरूस्ती निकृष्ट होत असल्याचा आरोप !

माजी जि.प.गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे कामाची केली पाहणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य महामार्ग अंकलेश्वर ते बुऱ्हाणपुर या मार्गावरील खड्डेमय झालेल्या रस्त्याची अनेक आंदोलनानंतर दुरुस्ती करण्यात येत आहे. सदरचे काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे करण्यात येत आहे. माजी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी देखील कामाची गुणवत्ता सुधारावी, अशा सुचना संबंधीत ठेकेदारास दिली आहे.

यावलपासून चोपडापर्यंत जाणाऱ्या अंकलेश्र्वर या राज्य मार्गावरील रस्त्याची मागील दोन वर्षापासून ठीक ठीकणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन रस्त्याची अवस्था ही अत्यंत बिकट झाली आहे. या खुड्डयातुन आपले वाहन वाचवितांना अनेक अपघात होवून दोन वर्षात सुमारे ५० ते ६० निरपराध नागरीकांना आपले जिव गमवावे लागले आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव असतांना संबधीत विभागाने कधी ही गांर्भीयाने लक्ष दिले नाही, या मार्गावरील रस्ता दुरुस्त व्हावा, यासाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थानी, विद्यार्थ्यांना आंदोलन देखील करावे लागले.

अखेर उशीरा प्रशासना जाग आली व मोठ्या प्रतिक्षेनंतर या रस्त्याच्या दुरूस्ती कामास सुरुवात झाली. मात्र संबंधीत ठेकेदार रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ठ प्रतिचे थातुर मातुर करून वेगळा होण्याच्या प्रयत्नात असल्याने जागृत लोकप्रतिनिधींच्या लक्षात आल्याने जि.प.चे माजी शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील यांनी सदरच्या कामास आक्षेप घेत काम बंद करण्याचे सांगीतले, असे असतांना ही संबधीत ठेकेदाराने आपले रस्ता दुरुस्ती निकृष्ठ काम सुरूच ठेवल्याने २२ ऑक्टोबर रोजी नागरीकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून माजी जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी किनगाव यावल दरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सदरचे काम हे निकृष्ठ प्रतिचे होत असल्याचे पाहुन संबधीतांना चांगलेच धारेवर धरले. तात्काळ कामाची गुणवत्ता ही निविदा प्रमाणे करावी, असे ठणकावून सांगितले. कामाची गुणवत्ता सुधारीत न केल्यास आपण वरिष्ठ पातळीवर या कामाची माहीती पाठवु असे सांगीतले आहे.

Protected Content