यावल तालुक्यात अवैध धंदे जोरात; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

यावल प्रतिनिधी । तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैद्यधंद्यांना जोर चाढला आहे. शहर आणि ग्रामीण भागात भागात मोठया प्रमाणावर अवैद्यधंदे खुलेआम सुरू असल्याने अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे.

दरम्यान यावल तालुक्यात सर्वत्र सट्टा मटक्याच्या पेठया सुरू असल्याने अनेक मजुरांनी आपल्या कामाकडे पाठ फिरवत आहे, तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैद्यरित्या सार्वजनिक ठीकाणी बेकाद्याशीर देशी दारू, हातभट्टीची घातक गावटी दारूची विक्री होत असल्याने अल्पवयीन मुलेही व्यसनाधीन होत आहे. याच बरोबर जिल्ह्यात सर्वत्र बंद असलेली कालबाह्य झालेल्या मिनिडोअर वाहनातून होणारी अवैद्य प्रवासी वाहतुकीमुळे गरजु प्रवासांची आर्थिक लुट करुन जास्तीचे भाडे वसूल करीत आहे.

विविध ठिकाणी जुगारीचे अड्डे सुरू असल्याने भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ असा प्रकारच्या अवैद्यधंद्यांना वेळीच प्रतिबंध करणे नागरीकांच्या हिताचे असेल अशी प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे .

Protected Content