माजी आमदारांचे औदार्य तहसील आवारात स्वखर्चाने बसविले सुशोभित फलक

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथिल माजी आमदारांचे औदार्य तहसील आवारात स्वखर्चाने सुशोभित फलक बसविल्याने गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी खंत व्यक्त केली होती.

काही दिवसांपूर्वी तांदळी येथील विद्यार्थिनी दहावी पास झाल्यानंतर पहिल्यांदा तहसील आवारात आली असता त्या ठिकाणी कोणतेही फलक नव्हते तरी या ठिकाणी विद्यार्थिनी तहसील कार्यालयाची शोधा शोध करू लागल्या.

तहसील कार्यालय सापडल्यावर त्या ठिकाणी त्यांना कुठलेही फलक आढळून आले नाही. त्यानंतर त्यांच्या मनात विचार आला कि या ठिकाणी तहसील ऑफिस अशे फलक असले पाहिजे? हे काम फक्त माजी आमदार कृषिभूषण शकता हे त्यांच्या लक्ष्यात आले व त्यांनी कार्यकर्त्याकडून मोबाईल नंबर घेऊन त्याच ठिकाणाहून साहेबराव यांना कॉल करून सत्य परिस्थिती सांगितली व दादांनी त्या विद्यार्थिनींना तुम्ही कुठं राहता कोणत्या शाळेत जाता तर मुलींनी मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना उत्तर दिले व दादांनी त्यांना तात्काळ तहसील कार्याल्यावर नावाचा फलक लावण्याचे आश्वासन दिले व दुसऱ्या दिवशी स्वखर्चाने तहसील कार्यावर नावाचा फलक लावला हे विद्यार्थीना कळताच गावाकऱ्यांकडून साहेबराव यांचे कौतुक होत आहे.

Protected Content